Weather Report : राज्यातील १९ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा; पाऊस कधी उघडेल?

राज्यातील १९ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा; पाऊस कधी उघडेल?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Weather Report : आज हवामान विभागाने राज्यातील १९ जिल्ह्यांना काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

Weather Report : जोरदार पावसाचा येलो अलर्ट

Weather Report: राज्यात मागील आठवडाभरापासून विविध भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे थंडी गायब झाली. गुरुवारी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामान होते. आज हवामान विभागाने राज्यातील १९ जिल्ह्यांना काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, तसेच सातारा आणि सांगली तर मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव, विजा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, वाशिम, यवतमाळ

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुणे, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Weather Report : उकाड्यात वाढ झाली

पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, कमाल तापमानातील घट, किमान तापमानातील वाढ कायम आहे. राज्यात रविवारपासून पाऊस उघडीप देण्याची शक्यता असून गारवा परतण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांश भागात पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर रब्बी पिकांना दिलासाही मिळाला आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *