Horoscope Today, 6 December आजचे राशिभविष्य -‘या’ राशीचे भाग्य उजळेल, धन आणि प्रसिद्धी मिळेल, बघा तुमचे भविष्य

Horoscope Today, 6 December आजचे राशिभविष्य
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Horoscope Today, 6 December आजचे राशिभविष्य -‘या’ राशीचे भाग्य उजळेल, धन आणि प्रसिद्धी मिळेल, बघा तुमचे भविष्यकुंभ राशीसाठी विशेष आदर आणि मीन राशीसाठी शुभेच्छा, तुमची कुंडली काय सांगते. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी बुधवार कसा राहील…

मेष: आर्थिक लाभ होणार

आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होणार आहे त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. कुटुंबातील कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी भावाचा सल्ला अवश्य घ्या. तुमच्या मुलांच्या लग्नाबाबत कुटुंबात चर्चा होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत कोणत्याही मुद्द्यावर भांडण झालं असेल तर त्यावर आज तोडगा निघेल. तुम्ही गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तर वेळ चांगली आहे तुमच्यासोबत आई-वडिलांचे आशिर्वाद आहेत.
आज नशीब ७५% तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा.

वृषभ : नोकरीत शत्रूचा त्रास वाढणार

नोकरीच्या ठिकाणी शत्रूचा त्रास आज जास्त होणार आहे.तुमचं काम काढून घेण्याचा देखील प्रयत्न होईल तेव्हा सांभाळून राहा आणि सावधगिरीने तुमचे काम करा. एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायचा विचार करत असाल तर दिवस अतिशय उत्तम आहे, हे काम तुम्हाला भविष्यात फायदेशीर ठरेल. तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. आज तुम्ही तुमची सर्व कामे त्वरीत संपवाल आणि वेळेवर घरी पोहोचाल त्यामुळे कुटुंबीय तुमच्यावर खुष असतील आणि घरात आनंदी वातावरण राहील.
आज नशीब ८१ % तुमच्या बाजूने असेल. योग प्राणायाम करा.

मिथुन: व्यवसायात नफा होणार

तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला आज तुमचा नफा होणार असून एखादी मोठी डिल देखील मिळू शकते. तुमच्या कार्यक्षेत्रातील संबंधीत अधिकाऱ्यांची मदत घ्या अन्यथा विरोधक तुमचा फायदा हिसकावून घेवू शकतात. मुलांच्या प्रगतीशी संबंधित आनंददायक बातम्या ऐकायला मिळतील, त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. आज संध्याकाळी गाडी चालवताना जरा सांभाळून चालवा आणि स्वतःची काळजी घ्या.
आज आर्थिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.
आज नशीब ८८% तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूचा १०८ वेळा जप करा

कर्क: व्यवसायात नवीन प्रोजेक्ट मिळेल

व्यवसायात तुम्हा एखादी डील फायनल केली तर भविष्यात तुम्हाला चांगला नफा मिळेल पण एक लक्षात ठेवा हे करत असताना तुमच्या बुद्धीचा योग्य वापर करा. कोणाच्या सांगण्यावरुन किंवा दबावाखाली जर तुम्ही हे काम करत असाल तर भविष्यात नुकसान होवू शकते. लवलाइफ चांगले आहे फक्त जोडीदाराच्या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करावे अन्यथा ठिणगीचे रुपांतर वणव्यात होवू शकते, म्हणजे दोघांमधील संघर्ष विकोपाला जाईल. मित्रांसोबत संध्याकाळ आनंदात जाईल
आज नशीब ७१% तुमच्या बाजूने राहील. भुकेल्या लोकांना अन्न द्या.

सिंह: पैशांची उधळपट्टी करु नका

तुमच्या व्यवसायात तुम्हाला फायदा मिळणार असून त्यात तुम्ही समाधानी असाल. तुमचे धैर्य आणि साहसा पुढे शत्रूची प्रत्येक रणनीती अयशस्वी ठरेल. दुसऱ्यांच्या कामात लक्ष देवू नका अन्यथा तुमचा वेळ वाया जाईल तसेच तुम्हाला एखाद्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागेल. तुमच्या सुखसोयीसाठी खरेदी करणार आहात फक्त अंथरुण पाहून पाय पैसा म्हणजे तुमचे उत्पन्न काय आहे ते पाहूनच खर्च करा. आज नशीब ८२% तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्र दान करा.

कन्या: दानर्धम आणि ज्येष्ठांची सेवा कराल

आजचा दिवस धार्मिक कार्य, दानधर्म करण, गरजू आणि ज्येष्ठांची सेवा करण्यात आजचा दिवस जाणार आहे. तुम्ही तुमच्या मिळकतीमधील काही भाग धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांवर खर्च कराल. तुम्ही व्यावसायिक असाल तर सांभाळून राहा आज प्रतिस्पर्धी हल्लाबोल करु शकतात. तुम्हा आज खूप डोकेदुखीचा त्रास होणार असून तुमचा ताण जास्त वाढणार आहे.खासगी नोकरदार नेहमीच नोकरीत बदल पाहत असतात, तुम्ही तसे करण्याचा विचार करत असाल तर थोडे थांबा, सध्या वेळ चांगली नाही, जिथे नोकरी करत आहात तिथेच राहा. जर तुमचा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याशी वाद झाला असेल तर आज तो वाद संपुष्टात येईल.
आज नशीब ९६% तुमच्या बाजूने असेल. ‘संकटनाशक गणेश स्तोत्र’ रोज पाठ करा.

तुला: तुमची खूप धावपळ होणार

आज तुम्ही भावंडांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असाल, त्यामुळे जास्त धावपळ होईल, परंतु आज तुम्हाला तुमच्या व्यवसायातील काही शत्रूंपासून सावध राहावे लागेल. तुमची कामे अपूर्ण रहावीत अशी तुमच्या शत्रूची इच्छा आहे. कोणती डिल करायची असेल तर वेळ उत्तम आहे. तुम्ही आज खूप आनंदी असाल पण आनंदाच्या भरात कोणाला जास्त आश्वासने देऊ नका, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्तापाचा सामना करावा लागले.आज तुम्हाला जोडीदार आणि मुलांच्या तब्येतीच्या काही समस्यांमुळे
तुम्हाला ताणतणाव जाणवेल.
आज नशीब ७९% तुमच्या बाजूने राहील. सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला अर्घ्य द्यावे.

वृश्चिक:ऑफिसमध्ये वातावरण चांगले आहे

वृश्चिक राशीच्या लोकांना आज समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या जोडीदाराची ओळख तुम्ही घरातल्यांसोबत करुन दिलेली नसेल, तर आज तुमच्या घरात तुमच्या प्रेमप्रकरणाबद्दल समजू शकते. आज तुम्हाला ऑफिसमध्ये अशी काही कामे देण्यात येतील ज्यामध्ये तुम्ही तज्ज्ञ आहात, त्यामुळे कामाच्या ठिकाणी दिवस छान असणार आहे. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना तीर्थक्षेत्राच्या सहलीला घेऊन जाऊ शकता, परंतु तेथे तुम्हाला तुमच्या वडिलांच्या तब्येतीची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. आजची संध्याकाळ कुटुंबासोबत असेल त्यामुळे तुम्हाला एक नवी ऊर्जा आणि उत्साह मिळेल.
आज नशीब ७७% तुमच्या बाजूने राहील. श्री गणेश चालिसा पठण करा.

धनु: उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार

धनु राशीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे, तुमच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. तुम्ही कामामध्ये खूप व्यस्त होणार आहात त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाही. याचा परिणाम तुमच्या तब्येतीवर होवू शकतो. वातावरण बदलामुळे तुम्ही कदातीच आजारी पडू शकता. तेव्हा तब्येतीकडे लक्ष द्या. ऑफिस वर्क आणि घर यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या रागीट स्वभावामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याला समस्या होत असेल तर तुम्ही मौन बाळगणे चांगले आहे. आज संध्याकाळी विवाह, नामकरण समारंभ इत्यादी कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
आज भाग्य ६८ % तुमच्या बाजूने असेल. गायींना गूळ खाऊ घाला.

मकर: कोर्टातील केस मार्गी लागेल

नोकरीत आज अडचणींचा सामना करावा लागू शकतो, तुम्हाला ते टाळण्याचा प्रयत्न करावा लागेल अन्यथा तुमच्या भविष्यातील प्रगतीवर परिणाम होवू शकतो. आज संध्याकाळी तुम्ही काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, ज्यामध्ये तुमचे काही पैसेही खर्च होतील. जर तुमचे घर, दुकान इत्यादींशी संबंधित कोणतेही प्रकरण
कोर्टात सुरु असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीने ते सोडवले जाऊ शकते आणि तुमच्या बाजूने निर्णय होऊ शकतो.
आज नशीब ९८% तुमच्या बाजूने असेल. बजरंग बाणचा पाठ म्हणा.

कुंभ: विशेष सन्मान होणार

आज तुमचा विशेष सन्मान होणार आहे किंवा तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे. कुंभ राशीच्या ज्या व्यक्ती सरकारी नोकरी करत आहेत त्यांचे प्रमोशन होणार आहे. खूप दिवसांपासून पदोन्नतीची वाट पाहत होतात अखेर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. एखाद्या महिलेमुळे तुमच्या घरात काही कलह निर्माण होऊ शकतो, ज्याचा तुम्हाला खूप त्रास होईल. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला संध्याकाळी भेटू शकतो. कुंभ राशीचे विद्यार्थी एखाद्या निकालाची वाट पाहत असतील तर तो आज येवू शकतो.
आज नशीब ७६% तुमच्या बाजूने असेल. मुंग्याना पीठाचे गोळे खावू घाला.

मीन: नशिबाची साथ मिळेल

आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे तुम्हाला एखादे गिफ्ट मिळू शकते. तुम्हाला एखाजी समस्या सतावत असेल तर पुढे येवून त्याबदद्ल बोला अन्यथा ती समस्या वाढू शकते. ज्येष्ठ व्यक्ती किंवा वरिष्ठांचा सल्ला घ्या ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. आज तुम्ही कोणासाठी तरी भेटवस्तू खरेदी कराल, खरेदी करताना तुमच्या स्वतःच्या मतांकडे लक्ष द्या.
आज नशीब ९२% तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा.

(टीप: वरील सर्व गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचक आणि दर्शकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्यावरून आम्ही कोणताही दावा करत नाही.)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *