अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मोठी घोषणा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Unseasonal Rain Damage: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक आडवे झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांना रडवले आहे. दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अवकाळी पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतीच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

Unseasonal Rain Damage राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके कुजली आहेत. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पावसाने शेतकऱ्यांना रडवले आहे. दरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : मुख्यमंत्री शिंदे

अवकाळी पावसामुळे ज्या ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे, त्या ठिकाणचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासोबतच राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तातडीने प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Unseasonal Rain Damage: राज्यातील विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले

नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा आदी जिल्ह्यांनाही काल झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. तसेच शेतकऱ्यांची पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

Unseasonal Rain Damage: बुलडाण्यात गारांचा पाऊस

बुलडाणा जिल्ह्यात काल रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावली. काही भागात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय माहिती संचार व तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधाची पाहणी केली.
अवकाळी पावसामुळे कापूस, तूर, गहू, हरभरा, फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सिंदखेडराजा देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातही शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेडच्या जाळ्या खाली पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक भागात शेतजमिनी वाहून गेल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *