अखेर तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Talathi Result : राज्यातील बहुचर्चित तलाठी परीक्षेसाठी उमेदवारांची निवड यादी भूमी अभिलेख विभागाने मंगळवारी रात्री उशिरा जाहीर केली. या परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली. अंतिम निवड यादीची प्रतीक्षा होती. अखेर मंगळवारी रात्री उशिरा अंतिम यादी जाहीर करण्यात आली.

Talathi Result : तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत 57 सत्रांमध्ये तीन टप्प्यांत घेण्यात आली. या परीक्षेत तलाठी पदासाठी राज्यभरातून 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी अर्ज केले होते. यापैकी 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षेची उत्तर यादी प्रसिद्ध केल्यानंतर, उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तर यादीबाबत कोणतीही हरकत किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 हा कालावधी देण्यात आला होता. संपूर्ण परीक्षेत उमेदवारांनी २८३१ प्रश्नांवर १६ हजार २०५ हरकती नोंदवल्या गेल्या होत्या. या हरकतींपैकी 146 वैध प्रश्नांवर एकूण 9072 हरकती परीक्षा आयोजित करणाऱ्या TCS कंपनीने मान्य केल्या. सामान्यीकरण पद्धतीनुसार, 48 उमेदवारांनी परीक्षेत 200 पेक्षा जास्त सामान्यीकृत गुण प्राप्त केले आहेत.

दरम्यान, या परीक्षेत हेराफेरी झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसह राजकीय संघटनांनी केला आहे. मात्र, हे आरोप व दावे फेटाळून लावत भूमी अभिलेख विभागाने गुणवत्ता यादीनंतर यशस्वी उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम सुरू केले होते. वरील सर्व बाबींचा विचार करून मंगळवारी रात्री उशिरा अंतिम यादी जाहीर करण्यात आली. ही यादी भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच आदिवासी जिल्ह्यांतील पेसा अंतर्गत रिक्त पदे भरली जातील. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे भूमी अभिलेख विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

महसूल विभागाची तलाठी (गट-क) संवर्ग थेट सेवा भरती 2023 मेरिट लिस्ट प्रसिद्ध झाली आहे. भरतीचा पुढचा टप्पा निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्याचा होता. त्यानुसार राज्यातील 23 जिल्ह्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी त्या जिल्ह्याच्या जिल्हा निवड समितीने तयार केली आहे. उर्वरित 13 आदिवासीबहुल जिल्ह्यांतील निवड यादी तयार करण्याचे काम सामान्य प्रशासन विभागाच्या पुढील आदेशानंतर संबंधित जिल्ह्यातील जिल्हा निवड समित्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. असे भूमी अभिलेख विभागाच्या अतिरिक्त संचालक व तलाठी भरती परीक्षेचे राज्य समन्वयक सरिता नरके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशीम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली. : या 23 जिल्ह्यांची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *