Talathi Bharati : “तर तलाठी भरती परीक्षा रद्द करा”; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

“तर तलाठी भरती परीक्षा रद्द करा”; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Talathi Bharati परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Talathi Bharati परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी पुरावे सादर करावेत, पुरावे मिळाल्यास परीक्षा रद्द करू, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.

रविवारी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भाजपच्या नवीन कार्यालयाला भेट दिली. कार्यालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. राज्यात Talathi Bharati मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यात तलाठी भरती परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडली. या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे कोणीही पुरावे दिल्यास त्याची चौकशी केली जाईल. पुरावे बरोबर असल्यास तपास करून परीक्षा रद्द करून दोषींवर कारवाई केली जाईल.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *