Maharashtra Cabinet Baithak सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Baithak
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Cabinet Baithak: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत सुमारे आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Maharashtra Cabinet Baithak मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला विविध विभागांचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत शेतकरी, सामान्य नागरी, शिक्षण, उद्योग क्षेत्राशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाजवळ आलेला घास वाहून गेला. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. या वेळी शासनाने दुष्काळग्रस्त भागाचा एकत्रित पंचनामा तातडीने सादर करावा, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, असा निर्णय घेण्यात आला. तसेच, राज्य सरकारने मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी सरकारी हमी वाढवली आहे.

Maharashtra Cabinet Baithak

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना मदत केली जाईल, अशी चर्चा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली. शेतकऱ्यांच्या नुकसानीला सर्वच मंत्र्यांनी प्राधान्य दिले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

“याआधीही खराब हवामान आणि गारपीट असताना सरकारने मदत केली आहे. यावेळीही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर क्षेत्राला शासन मदत करणार आहे. सर्व पंचनाम्यांचा एकत्रित आढावा घेतल्यानंतर तातडीने मदत दिली जाईल,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Maharashtra Cabinet Meet राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय झाले?

  • अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार (मदत व पुनर्वसन)
  • झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा (गृहनिर्माण विभाग )
  • राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा (शालेय शिक्षण)
  • मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार (मराठी भाषा विभाग)
  • मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली (अल्पसंख्याक विभाग )
  • औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन (उद्योग विभाग )
  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार (महसूल विभाग)
  • शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा (महसूल विभाग)

हे ही वाचा – massive boulders Peru Viral Video: दोन चालकांचा मृत्यू स्पर्श करून गेला, महामार्गावर दगड पडल्याने ट्रकचा चक्काचूर झाल्याने चमत्कार घडला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *