Rain Update: मराठवाड्यात कुठे पाऊस पडणार? राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस!

मराठवाड्यात कुठे पाऊस पडणार? राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Rain Update: हवामान खात्याने आज अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता व्यक्त केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आज सकाळपासून हलका पाऊस झाला. हिवाळ्यात अवकाळी पावसाचा परिणाम फळबागांवर होण्याची शक्यता असून हा पाऊस रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. दरम्यान, साताऱ्यासह अहमदनगरच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला.

Rain Update आज राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि राज्यातील अनेक भागात आज ढगाळ वातावरण राहणार आहे.

Rain Update सागरी अवस्था म्हणजे काय?

अंदमान समुद्र आणि परिसरात चक्री वारे वाहत आहेत. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, अवकाळी पावसाची शक्यता आहे. यावेळी राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किमी असेल.

Rain Update हवामान खात्याचा काय इशारा?

यासोबतच विदर्भातील अकोला, बुलढाणा चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम आणि यवतमाळ जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे.

गारपीट कशामुळे होते?

पश्चिमेकडून येणारे थंड वारे आणि दक्षिणेकडून येणारे उष्ण व वाफेचे वारे यांच्या संयोगाने गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत रविवार आणि सोमवारी म्हणजेच २६ आणि २७ नोव्हेंबरला पावसाचा जोर अधिक आहे.

Rain Update मराठवाड्यात कुठे पाऊस पडणार?

छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. बीड, हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून हवेत दव आहे. तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी झाले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *