महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे आणि 49 तालुके निर्माण होणार, पहा नवीन जिल्ह्यांची यादी
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

List Of New Districts : राज्य सरकारने 22 नवीन आणि 49 जिल्ह्यांच्या प्रस्तावित निर्मितीबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून त्यात वित्त सचिव, महसूल नियोजन विभाग, विभागीय आयुक्त यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे. समितीला ३१ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्याचे विभाजन करून घाटाखालील मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव खामगाव या सहा तालुक्यांचा समावेश खामगाव जिल्ह्यात करण्यात येणार आहे.

1998 नंतरचा प्रस्ताव

राज्यात 1988 नंतर 10 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सध्या 288 तालुके असलेले 36 जिल्हे आहेत. मात्र, सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्ह्यांमधील काही तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीची असल्याचे सांगत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या मागणीनुसार जिल्हा तालुक्यांची निर्मिती करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा निर्मितीसाठी एकूण 350 कोटी रुपये खर्च केले जातात

बुधवारी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या दालनात यासंदर्भात बैठकही झाली. जिल्हा निर्मितीसाठी किमान 350 कोटी रुपये खर्च करावे लागतात. सध्या राज्य सरकारवर तीन लाख कोटींहून अधिक कर्ज आहे. अशा स्थितीत जिल्हा निर्मितीवर खर्च करणे शक्य नसतानाही सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या मागणीमुळे 22 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीकडे सरकारने एक पाऊल टाकले आहे.

अचलपूरसाठीही पाठपुरावा सुरू आहे

विद्यमान 18 जिल्ह्यांचे विभाजन करून 22 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीबाबत नेत्यांनी काँग्रेस आघाडी सरकारला पत्र पाठवले होते. आता राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आल्यावर अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर जिल्हा निर्मितीसाठी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे.

प्रस्तावित नवीन जिल्हे (कंसात)

बुलडाणा (खामगाव)
यवतमाळ (पुसद)
अमरावती (अचलपूर)
भंडारा (साकोली)
चंद्रपूर (चिमूर)
गडचिरोली (अहेरी)
जळगाव (भुसावळ)
लातूर (उदगीर)
बीड (अंबेजोगाई)
नांदेड (किनवट)
अहमदनगर (शिर्डी, संगमनेर, श्रीरामपूर)
नाशिक (मालेगाव, कळवण)
सातारा (माणदेश)
पुणे (शिवनेरी)
पालघर (जव्हार)
ठाणे (मीरा भाईंदर, कल्याण)
रत्नागिरी (मानगड)
रायगड (महाड)

मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

खामगाव जिल्हा निर्मितीबाबत मी व आमदार आकाश फुंडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, 22 नवीन जिल्हे निर्माण करण्याचा प्रस्ताव असून त्यात खामगावचा समावेश आहे. पांडुरंग फुंडकर, आमदार, विधान परिषद

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
One thought on “List Of New Districts : महाराष्ट्रात 22 नवीन जिल्हे आणि 49 तालुके निर्माण होणार, पहा नवीन जिल्ह्यांची यादी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *