Drought declared in the state : राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर, हेक्टरी २५ हजार रुपये, पाहा तालुक्यांची यादी

राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Drought declared in the state: राज्यातील कमी पावसामुळे काही जिल्ह्यांतील परिस्थिती लक्षात घेऊन या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत तातडीने करण्याची विनंती केंद्राला करण्यात येणार आहे.

Drought declared in the state राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याबाबत मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ज्यामध्ये कमी पाऊस झाला आहे आणि या मंडळांना योग्य सवलत द्या. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात देण्यात येणाऱ्या मदतीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

Drought declared आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळ जाहीर करण्याबाबतच्या परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 मधील तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावी निर्देशांक विचारात घेतले आहेत.

राज्यात यंदा एकूण सरासरीच्या १३.४ टक्के पाऊस पडला असून रब्बीच्या पेरण्याही संथगतीने सुरू आहेत. यावेळी कृषी विभागाने आतापर्यंत 12 टक्के पेरण्या झाल्याची माहिती दिली.

जिल्हानिहाय Drought declared झालेले ४० तालुके

■ नंदुरबार : नंदुरबार

■ जळगाव : चाळीसगाव

■ जालना : भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा

■ छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर

■ नाशिक : मालेगाव, सिन्नर, येवला

■ पुणे: पुरंदर, सासवड, बारामती

■ बीड : वडवनी, धारूर, अंबाजोगाई

■ लातूर : रेणापूर

■ धाराशिव : वाशी, धाराशिव, लोहारा,

■ सोलापूर : बार्शी, माळशिरस, सांगोला.

■ धुळे : सिंदखेडा

■ बुलढाणा : बुलढाणा, लोणार

■ पुणे : शिरूर घोड नदी, दौंड, इंदापूर

■ सोलापूर : करमाळा, माढा

■ सातारा : वाई, खंडाळा

■ कोल्हापूर : हातकणंगले, गडहिंग्लज

■ सांगली : शिराळा, कडेगाव, खानापूर विटा, मिरज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *