Caste Validity Certificate
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Caste Validity Certificate: जात वैधता प्रमाणपत्र

अर्थात कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचे कागदपत्र असून याचा उपयोग अनेक शैक्षणिक आणि शासकीय कामाकरिता केला जातो. परंतु आपण या कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेटचा विचार केला तर याकरिता अर्ज केल्यानंतर साधारणपणे तीन महिन्याच्या आत मध्ये ते जारी केले जाते.

Caste Validity Certificate: शैक्षणिक नुकसान होण्याचे कारण

परंतु या कालावधीचा विचार केला तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून हे शैक्षणिक नुकसान होण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना
त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता Caste Validity Certificate हे आठ ते दहा दिवसाच्या आतमध्ये मिळणे गरजेचे आहे. याकरिता
विद्यार्थ्यांनी बार्टीच्या संकेतस्थळाला भेट देऊन यासाठी चा अर्ज करणे गरजेचे आहे.

Caste Validity Certificate: शाळेचा पुरावा नसेल तरी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर Caste Validity Certificate अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
होऊ नये याकरिता आता विद्यार्थी बार्टीच्या वेबसाईटला भेट देऊन जात वैधता प्रमाणपत्रकरिता अर्ज करू शकतात. यामध्ये सगळ्यात
महत्त्वाचे म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याकडे शाळेचा पुरावा नसेल तरी असे विद्यार्थी आता उत्पन्नाचा पुरावा सादर करून बार्टीच्या
माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता संबंधित समिती आठ ते दहा दिवसांच्या कमीत कमी कालावधीमध्ये प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना
उपलब्ध करून देत आहे. एवढेच नाही तर एखाद्या विद्यार्थ्याला जर खूपच गरज असेल तर एका दिवसात देखील समितीकडून जात वैधता
प्रमाणपत्र मंजूर केले जाण्याची शक्यता आहे.

Caste Validity Certificate

याकरिता समितीने माहिती देताना सांगितले आहे की विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतले आहे त्या महाविद्यालयात नाव नोंदणी करून महाविद्यालयातील जे काही कागदपत्रे आवश्यक आहेत ते कागदपत्र घेऊन समितीकडे जाऊन Caste Validity Certificate करिता ताबडतोब अर्ज करणे गरजेचे आहे. या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र अभावी कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होणार नाही किंवा तो नाकारला जाणार नाही याची काळजी समितीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

Caste Validity Certificate विद्यार्थ्यांनो सोबत लागतील ही कागदपत्रे

जातवैधता प्रमाणपत्राकरिता अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली आहे त्या कॉलेजचे पत्र व तुमचे चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, अर्जावर संबंधित कॉलेजच्या प्राचार्याची सही व शिक्का व अर्जदाराचा फोटो असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा, जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत, अर्जदाराच्या वडिलांचा शाळेचा दाखला,

पहिलीचा प्रवेश निर्गमन उतारा व जातीचा दाखला आणि वडील जर शिकलेले नसतील तर तसे शपथपत्र असणे गरजेचे आहे. त्यासोबतच अर्जदाराची आत्या व काका यांचा शाळा सोडल्याचा दाखला, अर्जदाराच्या आजोबा किंवा चुलत आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला, तसेच गाव नंबर सात,

हे ही वाचा – Solar Stove Price : सौर चुल्हा किंमत 2024 महिलांसाठी मोफत सौर चुल्हा योजना

कर पावती, खरेदीखत, फेरफार उतारा, गहाण खत आणि मालमत्ता पत्रक इत्यादी महसुली पुरावे आणि महत्त्वाचे म्हणजे वंशावळ नमुना नंबर तीन कोऱ्या कागदावर शपथपत्र व यासाठी आवश्यक फॉर्म नंबर 17( शपथपत्र) इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे सोबत असणे गरजेचे आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *