Cabinet Meeting: मंत्रिमंडळात सात मोठे निर्णय, राज्य आर्थिक सल्लागार समितीचा अहवाल सादर!

Cabinet Meeting: मंत्रिमंडळात सात मोठे निर्णय, राज्य आर्थिक सल्लागार समितीचा अहवाल सादर!
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत राज्यातील पिकांच्या पाण्यासह दुष्काळाच्या परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीत मराठवाड्यातील अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात 1345 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेचाही विस्तार करण्यात आला आहे. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध 341 शिफारसी करण्यात आल्या आहेत.

राज्य (Cabinet Meeting) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले संक्षिप्त निर्णय

  1. मंगरुळपीरमधील सत्तार सावंगी बॅरेजला मंजुरी. 1345 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल (जलसंपदा विभाग)
  2. राज्यातील ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी वाढला आहे
  3. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेचाही विस्तार करण्यात आला आहे.
    (ग्रामविकास विभाग)
  4. आता शैक्षणिक संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतील. मार्गदर्शक तत्त्वांची मान्यता
    (उच्च आणि तांत्रिक शिक्षण)
  5. राज्याच्या आर्थिक सल्लागार समितीच्या अहवालाचे सादरीकरण.
  6. $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य साध्य करण्यासाठी विविध 341 शिफारसी (योजना विभाग)

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रिमंडळपूर्व बैठक

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ पूर्व बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे काही मंत्री आणि आमदार उपस्थित होते. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेचा 2023 चा अहवाल मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला मुश्रीफ आणि भुजबळ उपस्थित नव्हते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *